Bihar Crime Saam tv
क्राईम

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Bihar Crime: बिहारमध्ये तरुणांनी दारू पार्टीदरम्यान भयंकर कृत्य केले. भांडणादरम्यान तरुणांमध्ये हाणामारी झाली. यावेळी त्यांनी मित्राच्या बायकोची निर्घृण हत्या केली. विटांनी हल्ला करत महिलेला जागीच संपवलं.

Priya More

Summary -

  • दारू पार्टीदरम्यान झालेल्या वादातून महिलेची हत्या

  • पाटणातील राजीव नगर येथे ही घटना घडली

  • महिलेच्या नवऱ्याच्या मित्रांनीच हे भयंकर कृत्य केले

  • आरोपींनी विटांनी ठेचून महिलेची हत्या केली

बिहारची राजधानी पाटणामधून हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. दारू पार्टी करताना मित्रांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद इतका टोकाला गेला की यामधील काही तरुणांनी मित्राच्या बायकोची निर्घृण हत्या केली. ही घटना शहरातील राजीव नगर रोड क्रमांक २५ डी परिसरात घडली. दारू पार्टीदरम्यान महिलेच्या नवऱ्याचे मित्रांसोबत भांडण झाले. या भांडणानंतर आरोपीने महिलेची विटेने ठेचून हत्या केली. महिलेच्या हत्येनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मृत महिलेचे नाव प्रियांका कुमारी (२५ वर्षे) असे आहे. प्रियांका मूळची समस्तीपूर जिल्ह्यातील होती. प्रियांका गेल्या सात वर्षांपासून तिचा नवरा मेघनाथ शहा आणि सात वर्षांच्या मुलासह पाटणाच्या राजीवनगर येथे भाड्याच्या घरात राहत होती. घटनेच्या वेळी प्रियांकाचा पती त्याच्या मित्रांसोबत दारू पार्टी करत होता.

प्रियांकाचा पती मेघनाथ शहा आणि त्याचे मित्र घरात दारू पित होते. त्यांच्यात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला. सुरुवातीला त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. पण नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात आरोपींनी मेघनाथ शहाची बायको प्रियांकाची हत्या केली. आरोपींनी प्रियांकावर विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पाटणामध्ये खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्रियांकाची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या घटनेच्या काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stale Rice: शिळा भात सतत खाल्ल्याने काय फरक पडतो?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये भाजप-शिवसेना युती; सूत्रांची माहिती

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकारणात पडद्यामागं मोठी घडामोड|VIDEO

SCROLL FOR NEXT