Bihar Crime Saam Tv
क्राईम

Crime: नवऱ्यासमोर बायकोवर सामूहिक बलात्कार, आरोपींकडून पीडितेच्या गुप्तांगावर अनेक वार

Bihar Crime: बिहारमध्ये विवाहित महिलेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेच्या नवऱ्याला बंधक बनवत त्याच्यासमोरच तिच्यावर अत्याचार केला.

Priya More
  • बिहारमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

  • नवऱ्याच्या डोळ्यासमोर आरोपींचं भयंकर कृत्य

  • महिलेच्या गुप्तांगावर अनेक वार

बिहारमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेच्या नवऱ्याला बंधक बनवून त्याच्या समोरच आरोपींनी पीडितेवर अत्याचार केले. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील चकिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेमुळे बिहार हादरले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या घटनेच्या सात दिवसांनंतर पीडित महिलेची प्रकृती खराब झाली. रुग्णालयात डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या गुप्तांगातून एक गोळी, एक खडा आणि लाकडाचा तुकडा बाहेर काढण्यात आला. पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जूनच्या रात्री ही सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. पण दुसऱ्याच दिवशी त्या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. ज्यामुळे रुग्णालयाच्या तपास प्रक्रियेवर आणि पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण सातव्या दिवशी महिलेला वेदना वाढल्या. तिची पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी कल्यानंतर पीडितेच्या शरीरात गोळीचे तुकडे, खडे आणि लाकडाचे तुकडे आढळून आल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. पीडित महिलेने जबाबात पोलिसांना सांगितले की, ५ जणांनी तिला जबरदस्तीने पकडले, एका निर्जन ठिकाणी नेले. तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला आणि तिने विरोध केल्यावर तिला मारहाण देखील केली.

पीडितेने असे देखील सांगितले की, आरोपीने तिच्या शरीरावर ब्लेडने वार केले आणि ती बेशुद्ध असताना तिच्यावर आणखी क्रूरपणे अत्याचार केले. काही महिन्यांपूर्वीच आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला होता. पण त्याच्याविरोधात योग्य कारवाई न झाल्यामुळे त्याने आपल्या साथीदारांसह महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT