Bihar Crime News SAAM DIGITAL
क्राईम

Bihar Crime News: सख्खा भाऊ पक्का वैरी! संशयावरून १५ वर्षीय बहिणीची निर्घृण हत्या

Crime News: पजांबमधील पटनायेथे एक संतापजनक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bihar Crime News

पजांबमधील पटनायेथे एक संतापजनक घटना घडली आहे. सख्खा भावानेच आपल्या १५ वर्षीय बहिणीची गळा दाबून निर्घृण हत्या केलीये. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मधुबनीतील लौकाहा पोलीस स्टेशन परीसरात राहत होती. नवरात्रीदरम्यान २१ ऑक्टोबर रोजी पीडिता संध्याकाळी जवळच्या मंदिरात गेली होती.

बराच काळ होऊन देखील ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांना शोधाशोध सुरू केली. तिचा खूप शोध घेतला परंतू दोन दिवस झाले तरी मुलीचा काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे तिच्या घरच्यांनी थेठ पोलीस ठाणे गाठले आणि मुलगी सापडत नसल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा तपास सुरु असताना पोलिसांना संशयाची सुई पीडितेच्या मोठ्या भावापर्यंत येऊन पोहचली.

संशयावरुन बहिणीची हत्या

पीडितेच्या भावाने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी चौकशीदरम्यान तिच्याबद्दल विचारले असता त्याने हत्येता सर्व प्रकार सांगितला. आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबूलीनुसार, आपल्या बहिणीला त्याने परीसरातील एका मुलासोबत पाहिले होते. यावरुन आरोपीला आपल्या बहिणीचे आणि त्या मुलाचे काही तरी संबंध आहेत असे वाटले. यावरुन आरोपी भावाने रागाच्या भरात बहिणीची गळा दाबून हत्या केली. तसेच तिचा मृतदेह नदी जवळ पुरला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT