Bihar Crime News Saam tv
क्राईम

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Bihar Crime News : बिहारमध्ये काकी-पुतण्याच्या संबंधामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊन दोघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बिहारमध्ये पुतण्या आणि काकीच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट

  • दोघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

  • रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

  • पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

बिहारमधून नात्याला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. या घटनेने नात्यांच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सख्खा पुतण्या चक्क काकीच्याच प्रेमात पडला होता. मात्र, या लव्हस्टोरीने असे हिंसक वळण घेतले की पोलिसांना कळाल्यानंतर त्यांच्या पायाखलची जमीनच सरकली आहे. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद (नाव बदलले आहे) या तरुणाचे डिसेंबर २०२५ मध्ये २५ वर्षीय नेहा (नाव बदलले आहे) हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच विनोद रोजगाराच्या निमित्ताने पुणे येथे राहण्यासाठी गेला. पती घराबाहेर असताना नेहा आणि तिचा १७ वर्षीय पुतण्या विजय (नाव बदलले आहे) यांच्यात जवळीक वाढली. त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यामध्ये गुप्त प्रेमसंबंध सुरू होते. मात्र, या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना मिळताच घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विनोदला पुण्यातून तातडीने घरी बोलावण्यात आले. १६ एप्रिल रोजी तो घरी परतल्यावर घरातील वाद अधिकच चिघळला.

त्यानंतर विजयने विनोद आणि नेहाला नको त्या अवस्थेत पहिले. हे दृश्य पाहून विजय बिथरला, त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबीयांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला वाचवले. त्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली. सामाजिक बदनामीची भीती आणि नात्यातील गुंतागुंत यामुळे नेहाने उंदीर मारण्याचे विष प्राशन केले. हे समजताच विजयनेही त्याचप्रमाणे विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ,मात्र दोघांचीही प्रकृती खालावली आणि उपचार सुरु असतानाच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप आणि आश्चर्य व्यक्त होत असून, सामाजिक मूल्ये आणि नातेसंबंधांच्या मर्यादांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elderly Father: वडिलांचं वृद्धाश्रमात निधन, अस्थी घेण्यासाठी आल्या नाहीत लेकी; ५१०० रुपये पाठवले अन् म्हणाल्या...

Asthma Attack : अस्थमा रुग्णांसाठी फक्त धूळच नाही, तर पावसाचे थेंबही ठरू शकतात घातक

Agriculture Scam: १५ कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, कृषिमंत्र्यांची मोठी कारवाई

Breaking News : खंडणीप्रकरणी भाजपच्या २२ नेत्यांचे निलंबन, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बुलढाणा- धावत्या एसटीची डिझेल टाकी रस्त्यावर; मेहकर आगाराचा भोंगळ कारभार उघड!

SCROLL FOR NEXT