Crime News: बिहारमधील बेतिया जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गोपालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा गोपालपूर गावात एका २५ वर्षीय महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
मृत चिमुकलीची ओळख पूजा कुमारी अशी असून ती अवघ्या सहा महिन्यांची होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गुरुवारी दुपारी बाळ सतत रडत असल्याने आई सीमा देवी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, बाळाचे रडणे थांबत नसल्याने तिचा संताप अनावर झाला. त्यानंतर तिने घरात असलेल्या धारदार शेतीच्या अवजाराने मुलीवर वार केल्याचे तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी महिलेने स्वतःलाही किरकोळ इजा करून घटनेचा माग लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर तिने घरातील सदस्यांना मुलगी झोपली असल्याचे सांगितले. मात्र, संध्याकाळी कुटुंबीयांनी बाळाची पाहणी केली असता ती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले असून हत्येसाठी वापरलेले धारदार अवजारही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेलाही उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या जखमेवर उपचार केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
गोपालपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अंकित कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आरोपी महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तिची मानसिक स्थिती वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होईल. सध्या तिची वैद्यकीय तपासणी आणि पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.