Bhiwandi Crime News Saam Digital
क्राईम

Bhiwandi Crime: भिवंडीत अमानुष प्रकार; तीन वर्षीय चिमुरडीला दिले चटके,आश्रम संचालाकास अटक

Bhiwandi Crime: भिवंडीतील एका आश्रममध्ये एका तीन वर्षाच्या मुलीला चटके दिल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

फियाज शेख, साम प्रतिनिधी

बदलापुरातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच भिवंडीत खासगी संस्थेच्या आश्रमात असताना एका चिमुरडीवर आश्रमात चटके देण्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी पिडीतेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. याप्रकरणी आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रे यास अटक करण्यात आलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील अमीना बाग परिसरात राहणाऱ्या यास्मीन रफिक शेख यांनी आपली तीन वर्षाच्या नातीला धामणकर नाका परिसरातील महाविर कॉम्पलेक्स इमारती मध्ये दत्ता गायसमुद्रे यांच्या सेवाभावी संस्थे तर्फे सुरू असलेल्या शोभा आश्रम या ठिकाणी ठेवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील अमीना बाग परिसरात राहणाऱ्या यास्मीन रफिक शेख यांनी आपली तीन वर्षाच्या नातीला धामणकर नाका परिसरातील महावीर कॉम्पलेक्स इमारतीमध्ये दत्ता गायसमुद्रे यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे सुरू असलेल्या शोभा आश्रम या ठिकाणी ठेवले होते. या ठिकाणी 23 मे ते 15 जुलै 2024 दरम्यान नातीच्या अंगावर फोड येऊन फुटल्याने जखमा झाल्याचे लक्षात आल्याने त्याची तक्रार केल्यावर चिमुरडीस ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डॉक्टरांच्या निष्कर्ष नुसार या जखमा भाजल्याने झाल्या असल्याचा अहवाल दिल्याने भोईवाडा पोलिसांनी आश्रम संचालक यांनी तिच्या पोटावर, पाठीवर,डाव्या कानाचे मागे व डाव्या डोळ्याचे बाजुला कशाच्या तरी सहाय्याने चटके देवून जखमा केल्या असल्याची तक्रार आजीने दिली. त्यावरून आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1) सह बालन्याय (मुलांची काळजी) हक्कांचे संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केलीय.

आरोपीस भिवंडी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या आश्रमचे अनधिकृत होते की अधिकृत यांसह इतर चौकशी सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT