Bhiwandi News Saam Tv
क्राईम

Bhiwandi News: मोठी बातमी! गुजरात एटीएसची महाराष्ट्रात कारवाई; भिवंडीतून ८०० कोटींचा ड्रग्जसाठा जप्त, VIDEO

Rohini Gudaghe

फैय्याज शेख, साम टीव्ही भिवंडी

भिवंडीमधून अमली पदार्थांसंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. भिवंडीत गुजरात एटीएसने कोट्यवधी रूपयांचा ड्रग्जसाठा जप्त केलाय. गुजरात एटीएसने भिवंडीतून ८०० कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केलाय. ७९२ किलो वजनाचा लिक्विड एमडी ड्रग्जसाठा भिंवडीत सापडला आहे. स्थानिक पोलिसांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. ते कारवाई संदर्भात अनभिज्ञ असल्याची माहिती मिळत आहे.

भिवंडीतून ८०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ५ आणि ६ ऑगस्ट रोजी भिवंडी शहरात ही मोठी कारवाई (Gujarat ATS) केलीय. या कारवाईत सुमारो ८०० कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात (Crime News) आलाय. यावेळी ७९२ किलो वजनाच्या द्रव अमली पदार्थाचा साठा एटीएसने ताब्यात घेतला आहे. त्याची किंमत ८०० कोटी रुपये सांगितली जातेय. याप्रकरणी पथकाने दोनजणांना अटक देखील केलंय.

गुजरात एटीएसची महाराष्ट्रात मोठी कारवाई

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल, अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. गुजरातमध्ये सुरत हद्दीतील पलसाना येथील करेली गावात मेफेड्रोन (एमडी) उत्पादन सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानंतर युनिटवर सुरू असलेल्या तपासादरम्यान एटीएसला भिवंडी येथील साठ्याची माहिती मिळाली (liquid Narcotics in Bhiwandi) होती. त्यानंतर गुजरात एटीएसने आपला मोर्चा भिवंडीकडे वळवला. तातडीने महाराष्ट्रामध्ये ही कारवाई करण्यात आलीय.

प्रशासन यंत्रणा सतर्क

विशेष म्हणजे या कारवाई संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने भिवंडीत (Bhiwandi) नेमकं कुठे कारवाई केलीय? कारवाईचं ठिकाण नक्की कोठे (Narcotics Seized) आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा हाती लागल्याने पोलीस यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलीय. शहरात अमली पदार्थांचा वावर वाढला आहे, आता या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सतर्क झाल्याचं दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT