Thane district shaken after 65-year-old woman raped and murdered in Bhiwandi; police begin probe. Saam tv
क्राईम

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

Bhiwandi Crime: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे धक्कादायक घटना घडलीय. येथे एका ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. गणेशपुरी स्टेशनच्या पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू केलाय.

Bharat Jadhav

  • भिवंडी तालुक्यात ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आलीय.

  • पोलिसांना महिलेचा मृतदेह शेतात आढळला.

  • मृत महिलेच्या गळ्यात सोन्याचे दागिने होते.

ठाणे जिल्हा भयंकर घटना घडलीय. जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात एका ६५ वर्षी महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकल्याची घटना घडलीय. या संतापजनक घटनेमुळे ठाणे जिल्हा हादरून गेलाय. भिवंडीतील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय.

पोलिसांना मृत वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्या शेतात आढळून आला. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करत तेथील काही पुरावे गोळा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेच्या गळ्यात ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. हे दागिने मृतदेहावरच होते, त्यामुळे या गुन्ह्यामागे चोरीचा हेतू नसावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याचं पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे यांनी माहिती दिली.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर बलात्कार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपधीक्षक यांनी दिलीय. या घटनेबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अलिबाग शहरातील एका अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. दरम्यान आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,पीडित अल्पवयीन मुलीला आरोपीने तिचा आणि तिच्या मित्रासोबतचा फोटो तिच्या कुटुंबियांना दाखवण्याची धमकी दिली. तसेच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली होती. या फोटोचा वापर करून आरोपीने पीडितेवर अत्याचार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT