husband wife clashes Saam tv
क्राईम

मला तुरुंगात टाका, पण तिच्यासोबत... बायकोच्या जाचाला कंटाळला, आयटी इंजिनिअरने थेट दिल्ली गाठली!

husband wife clashes : पत्नीने नवरा हरवल्याची पोलिसांत तक्रारही दाखल केली. बंगळुरु पोलिसांनी १२ दिवस तपास करुन त्याला मॉलमध्ये चित्रपट पाहताना ताब्यात घेतले.

Namdeo Kumbhar

Husband Wife Relationship News : बायकोच्या जाचाला (husband wife clashes) कंटाळून आयटी इंजिनिअर नवऱ्याने बंगळुरुसोडून थेट नोयडा गाठलं. तो तिथे सीमकार्ड बदलून राहत होता. पत्नीने नवरा हरवल्याची पोलिसांत तक्रारही दाखल केली. बंगळुरु पोलिसांनी १२ दिवस तपास करुन त्याला मॉलमध्ये चित्रपट पाहताना ताब्यात घेतले. पत्नीने दिलेली हरवल्याची तक्रार बंद करुन त्याला पोलिसांनी घरी पाठवले. या प्रकरणाची बंगळुरुमध्ये चर्चा सुरु आहे.

आपल्याकडे नवरा-बायकोचे नाते हे सात जन्माचे असते असं म्हणतात. सोबत जगण्याच्या शपथा घेतल्या जातात, कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देण्याचं वचन दिले जाते. पण बंगळुरुमध्ये एक आयटी इंजिनिअर पत्नीला कंटाळून निघून गेला. पत्नीच्या छळाला कंटाळून त्याने दिल्ली गाठले. पतीला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा तो जेकाही बोलला ते ऐकूण सर्नांनाच धक्का बसला.

तो पोलिसांना म्हणाला की, "मला तुरुंगात टाका, पण मला तिच्यासोबत राहायचे नाही." त्या व्यक्तीचे नाव विपिन गुप्ता गुप्ता आहे. तो बंगळुरुतील एका आयटी कंपनीमध्ये चांगल्या पगारावर कामाला आहे. ४ ऑगस्ट रोजी तो बंगळुरुमधून अचानाक गायब झाला होता. पत्नीने बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रारही दिली होती. पोलिसांनी १२ दिवस तपास केल्यानंतर नोएडातील एका मॉलमधून त्याला ताब्यात घेतले. तो तिथे चित्रपट पाहात होता.

नेमकं प्रकरण काय ?

४ ऑगस्ट रोजी विपिन गुप्ता अचानाक बेपत्ता झाला. त्याला शोधण्यासाठी पत्नीने सोशल माीडियावर कॅम्पेनही केले. त्याशिवाय पोलिसांत तक्रारही दाखल केली. आपल्या पतीचे कुणीतरी अपहरण केल्याचं तिला वाटले. त्यातून तिने पोलिसांत तक्रार केली, त्याशिवाय सोशल मिडिया वर कॅम्पेनही केले. पोलिस तपास व्यावस्थित करत नसल्याचा आरोपही तिने केला. त्यानंतर विपिन गुप्ता याची बातमी सोशल मीडियात ट्रेंड झाली होती. सर्वजण यावर खमंग चर्चा करत होते.

पोलिसांनी त्यानंतर तपास अधिक वेगाने केला. पोलिसांनी बस स्टँड, रेल्वे स्टेशन आमि विमानतळावरील सीसीटीव्ही तपासले, पण मिळालेच नाही. पण नोएडमध्ये विपिन याने नवे सिम कार्ड घेऊन जुन्याच मोबाईलमध्ये टाकले. त्यावरुन पोलिसांना सुगावा लागला. पोलिसांनी थेट नोएडा गाठले अन् त्याला ताब्यात घेतले.

विपिनने पोलिसांना काय सांगितले?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार विपिन गुप्ताने पोलिसांना सांगितले की, पत्नी त्रास देते तसे छळ करते. मी तिचा दुसरा नवरा आहे. तीन वर्षांपूर्वी आमची भेट झाली. त्यावेळी तिला १२ वर्षांची मुलगी होती, तिचा घटस्फोट झालेला होता. पण तिने अद्याप लग्न झालेले नाही, असे मला सांगितले. त्यानंतर आमचे लग्न झाले. आम्हाला आठ महिन्याची मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT