Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: सीईओच्या ४ वर्षीय मुलाच्या हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; मारेकरी आईनंच सांगितलं हॉटेलच्या खोलीत नेमकं काय घडलं?

Goa Crime News: बेंगळुरूतील स्टार्टअपच्या सीईओ सूचना सेठने आपल्या ४ वर्षीय मुलाची हत्या केली आहे. याप्रकरणी आता सूचना सेठ यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bengaluru CEO Killed Her Son News Update:

बेंगळुरूतील स्टार्टअपच्या सीईओ सूचना सेठने आपल्या ४ वर्षीय मुलाची हत्या केली आहे. याप्रकरणी आता सूचना सेठ यांनी पोलिसांना मोठी माहिती दिली आहे. गोव्यातील कँडोलिम येथील एका हॉटेलमध्ये ही संपूर्ण घटना घडली होती. पतीने मूलाला भेटू नये यासाठी सूचनाने हे टोकाचे पाऊल उचलले होते. याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे.

याप्रकरणी हॉटेलच्या स्टाफला सूचनावर संशय आला होता. त्यामुळे त्यांनी रुममध्ये जाऊन चेक केले तेव्हा तिथे रक्ताचे डाग असल्याचे दिसले. हे रक्ताचे डाग सूचनाचेच होते. सूचनाने हाताची नस कापून आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आला. सूचना आपल्या ४ वर्षीय मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरुन टॅक्सीतून कर्नाटकला पळून जात होती. याप्रकरणी सूचनाला ६ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. (Latest News)

कर्नाटकात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यात मुलाचा मृत्यू जीव गुदमरल्याने झाल्याचे म्हटले आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी याप्रकरणी माहिती दिली. मुलाच्या मानेवर कोणत्याही खूना दिसत नाहीत. त्याच्या नसा सूजल्या होत्या. त्यामुळे मुलाची हत्या करण्यासाठी उशी, कपडा किंवा टॉवेल वापरला असवा. त्याच्या शरीरावर कुठेच जखमा दिसत नव्हत्या. त्याची हत्या ३६ तासांपूर्वी झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचनाचा तिचा नवरा वेंकट रमणपासून घटस्फोट झाला होता. त्यावेळी मुलाने दर रविवारी मुलाला भेटण्याचा निर्णय कोर्टाने दिला होता. मात्र, सूचनाला हे मान्य नव्हते. त्यामुळेच सूचनाने मुलाची हत्या केली.

कर्नाटकातील आयमंगला पोलिस ठाण्यात सूचनाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिला गोव्यात आणण्यात आले. तिला म्हापसा न्यायलयात हजर केले. गोवा पोलिसांनी कळंगुट पोलीस ठाण्यात सूचनाची २ तास चौकशी केली. त्यावेळी मुलाने त्याच्या वडिलांना भेटू नये म्हणून मी त्याला घेऊन गोव्याला आली होती, असे सांगितले.

याप्रकरणी सूचनाने सांगितले की, मला मुलाला मारायचे नव्हते, तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते. परंतु त्याचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर ती खूप घाबरली आणि मृतदेहाजवळ जाऊन बसली. त्यानंतर तिने स्वतः च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सूचनाने २०१० मध्ये व्यंकट रमनशी लग्न केले होते. २०१९ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर २०२० साली या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात होती. असे सांगण्यात येत आहे. घटस्फोटावेळी मुलाला दर रविवारी वडिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. या निर्णयाने सूचना नाराज होती. त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले असावे, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT