Crime Saam tv
क्राईम

Crime : नको तिथे हात लावला, चाकूचा धाक दाखवून तरुणीचे शोषण; मारहाण करुन पैसेही चोरले

Crime News : एका २१ वर्षीय तरुणीच्या खोलीमध्ये एक अज्ञात व्यक्ती घुसला. त्याने तरुणीवर लैंगिक छळ केला. तरुणीला मारहाणी करुन आरोपी तिच्या खोलीतील पैसे घेऊन पळून गेला.

Yash Shirke

  • बंगळुरूतील लेडीज पीजीमध्ये २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक छळ

  • आरोपीने चाकू दाखवत मारहाण करून पैसे चोरले.

  • सीसीटीव्हीमध्ये घटना कैद, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Shocking News: पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीच्या खोलीत एक अनोळखी व्यक्ती घुसला. या अज्ञात व्यक्तीने लैंगिक छळ केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. खोलीतील पैसेही चोरल्याचे तरुणीने म्हटले आहे. ही घटना बंगळुरूच्या गंगोत्री सर्कलजवळील लक्ष्मण दुर्गा लेडीज पीजीमध्ये पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तरुणी पीजीमध्ये झोपलेली असताना अज्ञात व्यक्ती तिच्या खोलीत घुसला. या व्यक्तीने तरुणीच्या पायांना, हातांना स्पर्श करायला सुरुवात केली. स्पर्श जाणवल्यानंतर तरुणी घाबरुन उठली. त्यानंतर आरोपीने तिला चाकू दाखवत धमकावले. आरोपीने तरुणीच्या पायावर नखांनी ओरखडे काढले आणि तिला दोनदा मारहाण केली. त्यानंतर आरोपी खोलीतील पैसे घेऊन पळून गेला.

आरोपी पळत जात असताना तरुणी त्याच्या मागे गेली आणि तिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने जिना उतरत असताना तरुणीला पुन्हा एकदा मारहाण केली. मारहाणीनंतर तो पळून गेला. पळतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी ही नोकरदार असून ती ऑगस्ट महिन्यापासून दोन तरुणींसह पीजीमध्ये राहत आहे. ज्या वेळेस ही घटना घडली, तेव्हा तरुणीची एक रुममेट कामावर होती, तर दुसरी झोपली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७५, कलम ७६ आणि कलम ३२९ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे आणि तपास सुरु केला आहे. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. पीजीची जागा मागील दोन महिन्यापूर्वी सुरु झाली आहे. या घटनेच्या वेळी सुरक्षा रक्षक झोपलेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पीजी मालकाने ही घटना पीडितेच्या खोलीत नव्हे, तर कॉरिडॉरमध्ये घडल्याचे म्हटले आहे. या संबंधित संपर्क साधला असताना पीडितेने बोलण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT