Bengaluru man files police complaint saam tv
क्राईम

Crime News: बायको अश्लील व्हिडीओ पाठवतेय आणि..., पत्नीच्या विचित्र मागणीमुळे नवरा हैराण, थेट पोलीस ठाण्यात पोहचला

Bengaluru man files police complaint: बेंगळुरूमध्ये एका व्यक्तीने पत्नीविरोधात गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात मानसिक आणि वैवाहिक वादाचा मुद्दा समोर आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बंगळूरूमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. त्याने आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याला वारंवार अश्लील व्हिडिओ पाठवत होती आणि शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. त्याने आपल्या सासरच्या मंडळींवरही वैवाहिक जीवनात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे.

काय आहे हे नेमकं प्रकरण?

नागरभावमध्ये राहत असलेल्या या व्यक्तीने बंगळूरुमध्ये एका खाजगी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शिल्पासोबत लग्न केले. लग्नानंतर तो जक्कुरूमध्ये एका व्हिलामध्ये राहायला गेला. त्याने आरोप केला आहे की, त्याची सासू आशा यांनी त्याच्या घरात येण्यावर निर्बंध घातले. मुलीसाठी चांगला मुलगा मिळावा म्हणून सासूने त्याला मुलीला सोडून देण्यास प्रवृत्त केले.

तक्रारदाराच्या मते, या सगळ्या प्रकारामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता. त्याने असा आरोप केला आहे की, पत्नी त्याच्या आर्थिक परिस्थितीची चेष्टा करायची आणि तिच्या लाइफस्टाइलला तो सपोर्ट करू शकत नाही यावरून नाराजी व्यक्त करत असे. तसेच ती तिच्या श्रीमंत मित्रांसोबत वेळ घालवत होती. पार्टी आणि दारूचं सेवन अशा सवयींमध्ये ती रमलेली होती, असा दावाही त्याने केला आहे.

अश्लील व्हिडिओ पाठवून दबाव टाकल्याचा आरोप

यावेळी त्याने आपल्या पत्नीवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पत्नी त्याला वारंवार अश्लील व्हिडिओ पाठवत असे आणि तशा गोष्टी करण्यासाठी दबाव आणत होती.

इतकंच नाही तर तिने त्याला तिच्या एका मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी इतरांसोबत शेअर करण्याचा आग्रह देखील ती करायची. पत्नीने आपल्या माजी प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्याचाही दावा तक्रारदाराने केला आहे.

कुटुंबासोबतही केली चर्चा

हा वाद याआधी दोन्ही कुटुंबांसमोर मांडण्यात आला होता. 4 जुलै 2024 रोजी फॅमिली मेडिएशनही करण्यात आलं होतं. मात्र, त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. पुढे 24 सप्टेंबर 2024 रोजी पतीला घरातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे, तर पत्नीला तिची आई चेन्नईला घेऊन गेली.

घर सोडताना पतीला फक्त त्याचा युनिफॉर्म आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली, असं त्याचं म्हणणं आहे. त्याने असाही आरोप केलाय की, घरात ठेवलेली 1.87 लाख रुपये रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, पासपोर्ट, शैक्षणिक कागदपत्रं आणि इतर महत्त्वाच्या वस्तू त्याला देण्यात आल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाफेड-एनसीसीएफचा कांदा चेन्नईकडे रवाना; मनमाडहून रेल्वेने लोडिंग सुरू

High Cholesterol Warning Sign: जर शरीराच्या या 3 भागांत भंयकर वेदना होत असतील तर व्हा सावध; कोलेस्ट्रॉल वाढल्याचे आहेत संकेत

Side Effects of Pomegranate: आरोग्यासाठी फायदेशीर डाळिंब पण ‘या’ ५ लोकांनी चुकूनही खाऊ नये; शरीराचे होऊ शकते नुकसान

Nepal Flood: '२० मिनिटांत पाणी पोहचेल ', नेपाळमध्ये पुन्हा महापूर येणार; ५ पट धोका वाढला, प्रशासनाकडून अलर्ट जारी

School Admission Age: मुलांना शाळेत कधी पाठवावं? योग्य वय ठरवताना लक्षात ठेवा ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT