Bengaluru Crime Saam Tv
क्राईम

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Bengaluru Crime: बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीची हत्या करण्यात आली. शेजारी राहणारा १८ वर्षीय तरुण खिडकीतून घरात घुसला. त्याने तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पण तिने नकार दिल्यामुळे त्याने तिची हत्या केली.

Priya More

Summary -

  • बंगळुरूमध्ये ३४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीची हत्या

  • शेजारी राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने केलं भयंकर कृत्य

  • खिडकीतून घरात घुसला आणि शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला

  • शरीरसंबंधाला विरोध केल्याने तरुणीची हत्या केली

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. ३ जानेवारीला या तरुणीचा मृतदेह घरामध्ये सापडला होता. सुरूवातीला तिचा मृत्यू अपघाती झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला होता. नंतर तिने आत्महत्या केली असावी असे म्हटले जात होते. पण या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली. या ३४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीची हत्या करण्यात आली. घरा शेजारी राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने तिची हत्या केली. शरीरसंबंधाला विरोध केल्यामुळे त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

शर्मिला डीके असं या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीचे नाव होते. ती राममू्ती नगरमधील सुब्रमण्या लेआऊट येथील अपार्टमेंटमध्ये एकटीच भाड्याने घर घेऊन राहत होती. ३ जानेवारीला घरामध्ये संशयास्पद अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना एकतर्फी प्रेमातून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. कर्नल कुरई (१८ वर्षे) या तरुणाने तिची हत्या केली. आरोपी तिच्या घराशेजारीच राहतो. तो कॉलेजचा विद्यार्थी आहे.

३ जानेवारीच्या रात्री ९ वाजता आरोपी स्लाइडिंग खिडकीतून शर्मिलाच्या घरामध्ये घुसला. त्याला शर्मिलासोबत शरीरसंबंध ठेवायचे होते. पण शर्मिलाने विरोध करत आरडाओरडा केला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. आरोपीने शर्मिलाचे तोंड दाबले आणि ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी घराला आग लावली. त्याने बेडरूममध्ये आग लावली पण आग संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरली.

पोलिसांनी आरोपीविरोधात कलम १०३,६४,६६ आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात असेही समोर आले आहे की, शर्मिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. शेजाऱ्यांच्या मते, शर्मिला अधूनमधून त्याच्याशी बोलत असे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT