Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: दुर्दैवी! कोलकात्यानंतर बंगळुरुमध्ये कुकर्म, बाईकरने लिफ्ट दिली अन् २१ वर्षीय तरुणीची अब्रू लुटली!

Namdeo Kumbhar

Bangalore Crime News: कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देश हादरला. डॉक्टर महिलेसोबत अमानवीपणे अत्याचार केला. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उमटली आहे. देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो. पण तरीही महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झाल्या नाहीत. आज बंगळुरुमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अनोळखी बाईकरने २१ वर्षीय तरुणीसोबत लैंगिक अत्याचार केलाय. याप्रकऱणामुळे बंगळुरुमध्ये खळबळ माजली आहे.

रविवारी पहाटे एका अज्ञात मोटरसायकल चालकाने २१ वर्षीय तरुणीसोबत कुकर्म केल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त रमण गुप्ता यांनी सांगितले की, २१ वर्षीय मुलगी शहरातील एका महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ती कोरमंगला येथील एका कार्यक्रमानंतर हेब्बागोडी येथील आपल्या घरी परतत होती. त्यावेळी दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट दिली होती. त्यानेच अज्ञात स्थळी तिच्यासोबत जबरदस्ती केली. आम्ही बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

रमण गुप्ता म्हणाले की, कोरमंगला येथे तरुणी एका कार्यक्रमाला गेली होती. परत येत असताना तिच्यासोबत अत्याचार झाले. याबाबत फक्त एक संशयित आहे. मुलीला लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीवर बलात्काराचा संशय असून आमची चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले होते आणि त्यांनी पीडिता आणि तिच्या नातेवाईकांसोबत याबाबत विचारपूस केली. याप्रकरणाचा तपास करम्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. तपास करत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, २१ वर्षीय पीडितेच्या मित्रांना तिच्या फोनवरून लोकेशनसह इमर्जन्सी मेसेज आला होता. मेसेज मिळताच मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी पीडिता नग्नावस्थेत आढळून आली. त्यांनी पीडितेला तातडीने रुग्णालयात नेले. त्यानंतर पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT