Bomb Threat Through Gmail Yandex
क्राईम

Bomb Threat To School: 16 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेल, काय आहे प्रकरण?

Rohini Gudaghe

Bengaluru Crime News Bomb Threat To School

बंगळुरूमध्ये (Bengaluru) 16 शाळांना मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. त्यामुळे शाळांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हा ईमेल वाचल्यानंतर शाळेतच नव्हे तर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही घबराट पसरली होती. तत्काळ सर्व शाळांमध्ये बॉम्बशोधक पथके पाठवून तपास करण्यात आला. त्यानंतर या धमकीत तथ्य नसल्याचं निष्पन्न झाले. शहरात दहशत निर्माण करण्यासाठीच शाळांना हा ईमेल पाठवण्यात आला होता. (Latest Crime News)

जिमेलने बंगळुरूच्या शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. परदेशात बसून ही धमकी दिली गेल्याचं समोर येत (Bomb Threat To School) आहे. आयपी ॲड्रेस ट्रेस केल्यानंतर, बंगळुरू पोलिसांनी खातेधारकाच्या तपशीलासाठी इंटरपोलला पत्र लिहिलं होतं. इंटरपोलने या संदर्भात जीमेलला नोटीस बजावली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१६ शाळेंना धमकीचा मेल

ही धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगण्यास जीमेलने स्पष्ट नकार दिला आहे. जीमेलने म्हटलंय की, ईमेल पाठवणाऱ्याचे नाव उघड करणे कोणत्याही कायद्याच्या कक्षेत येत नाही. बंगळुरू पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने जीमेलला नोटीस बजावून संबंधित माहिती देण्याचे निर्देश दिले होते. आता जीमेलने त्याचे उत्तर इंटरपोलला पाठवले (Bomb Threat Through Gmail) आहे.

बंगळुरू पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यांनी ईमेल पाठवणाऱ्या संगणकाचा आयपी पत्ता काढला असता हा संगणक परदेशात कुठेतरी असल्याचे आढळून (Threat To School) आले. या माहितीनंतर बेंगळुरू पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिले. त्याचवेळी इंटरपोलने बेंगळुरू पोलिसांच्या पत्राच्या आधारे जीमेलला नोटीसही बजावली होती. ज्या व्यक्तीने हा ईमेल पाठवला होता, त्याची संपूर्ण माहिती मागवली होती.

शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

बराच वेळ मौन पाळल्यानंतर आता जीमेल कंपनीने इंटरपोलला आपलं उत्तर पाठवलं आहे. त्यांनी यामध्ये जीमेल कंपनी कोणत्याही जीमेल खातेधारकाची कोणतीही माहिती देण्यास बांधील नसल्याचं म्हटलं (Bengaluru Crime News) आहे. एप्रिल २०२२ नंतर बंगळुरूच्या इतर ७० शाळांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातही अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या.

यावर्षी जानेवारी महिन्यात जवळपास १२ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) देण्यात आली होती. या सर्व प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. यावेळी व्हीपीएन आणि आयपी ॲड्रेसची तपासणी केली असता हे सर्व ईमेल परदेशातून पाठवण्यात आल्याचे समोर आले. आता जीमेलने या सर्व खात्यांची माहिती देण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत पोलिसांचा तपासही ठप्प झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satyendar Jain Bail: सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक? वाचा...

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

SCROLL FOR NEXT