Beed Crime  Saam Tv
क्राईम

Crime: बीड नव्हे तर बिहार! निवृत्त पोलिसाला डांबून ठेवलं, २ तास अमानुष मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Beed Crime: बीडमध्ये माजी पोलिसाला १० ते १५ जणांनी खोलीत डांबून ठेवत दोन तास अमानुष मारहाण केली. अंग काळे-निळे पडेपर्यंत आणि हात-पाय तुटेपर्यंत या पोलिसाला मारहाण करण्यात आली. तसंच पाणी मागितले असता तोंडावर लघुशंका केली.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये निवृत्त पोलिसालाच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशासाठी सालगड्याचं अपहरण करण्यात आले होते. त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या माजी फौजदाराला खोलीमध्ये डांबून १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केली. पिण्यासाठी पाणी मागितले असता आरोपींनी त्यांच्या तोंडावर लघूशंका केली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. अशामध्ये बीडमधील गुंडाराज कायम असून आरोपींना पोलिसांचा धाक उरलाय की नाही? असा सवाल केला जात आहे.

बीडचा बिहार होत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात दररोज मारहाणीच्या घटना घडत असून या घटना थांबायचे नाव घेत नाही आहे. दिवसांत दोन-तीन ठिकाणी तरी मारहाणीच्या घटना घडतात. कधी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर तर कधी पोलिस ठाण्यासमोर अशा घटना घडताना दिसतात. अशामध्ये आणखी एक धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. पैशासाठी एका सालगड्याचं अपहरण करण्यात आले होते.

फक्त बाराशे रुपयांसाठी सालगड्याचे अपहरण करून त्याच्याकडून दीड लाखांची लूट केली. अपहरण करण्यात आलेल्या सालगड्याला सोडवण्यासाठी गेलेल्या निवृत्त सहाय्यक फौजदाराला १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केली. खोलीमध्ये डांबून ठेवत त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. पाणी मागितले तर आरोपींमधील तिघांनी त्यांच्या तोंडावर लघुशंका केली. दोन तास माजी फौजदाराला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मुलाने येऊन सुटका केली. या माजी फौजदाराने ३८ वर्षे पोलिस म्हणून सेवा दिली.

हा प्रकार शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडला. माजलगाव तालुक्यातील ढोरगाव शिवारात माजी फौजदाराला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये माजी फौजदाराच्या शरीराला चार ते पाच ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. जखमी झालेल्या माजी फौजदारावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT