parli shivraj divate attack by samadhan munde gang Saam Tv News
क्राईम

Beed Crime : शिवराज दिवटे मारहाण प्रकरण; समाधान मुडेंच्या गँगला मोक्का लावा अन्यथा..., परळीत नागरिक आक्रमक

Shivraj Divate Assault Case : ग्रामस्थांनी आज रविवारी सकाळी बीड-परळी मार्गावर ठिय्या घातला आहे. जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत ठिय्या मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

Prashant Patil

बीड : परळीच्या लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे या तरुणाला १० ते १५ जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केली होती. या प्रकरणी परळी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींना अटक करा, याशिवाय समाधान मुंडे याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी आज रविवारी सकाळी बीड-परळी मार्गावर ठिय्या घातला आहे. जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत ठिय्या मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

परळीतील जलालपूर येथील मंदिरातील एका समारंभात पंगतीच्या कार्यक्रमात किरकोळ वाद झाल्यानंतर शिवराज दिवटे याचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला होता. समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराजला टोकवाडी रस्त्यावरील डोंगरात माळावर नेऊन बेदम मारहाण केली. लाकडी दांडके, कत्ती आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला मारहाण करण्यात आली. सुदैवाने काही लोकांनी हा प्रकार बघितल्यामुळे शिवराज दिवटे याचा जीव वाचला.

शिवराज दिवटे याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्याला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. आरोपींमध्ये समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेष गिरी, प्रशांत कांबळे, सौमित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वागलकर, सुराज्य गित्ते, सूरज मुंडे यांचा समावेश आहे. इतर ११ अनोळखी तरुणांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या टोळक्यात अनेकजण १८ ते १९ या वयोगटातील होते. हे सर्वजण टोकवाडी, डाबी, नंदागौळ, परळी येथील रहिवासी आहेत. आरोपींनी शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा व्हिडीओ चित्रित करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT