Beed Crime Saam Tv
क्राईम

Beed Crime News: अंबाजोगाईत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग ; रोडरोमियोने बळजबरीनं कॉफी शॉपमध्ये नेत काढली छेड

Girl Physically Assaulted: बीड जिल्ह्यात नेहमीच खून, दरोडे, बलात्कार अशा घटना घडत असतात. आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधून एका महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

College girl Physically Assaulted

तरुणींची छेडछाड आणि त्यांची सुरक्षितता हा नेहमीच गंभीर विषय आहे. शाळा, महाविद्यालय परिसरांमध्ये नेहमीच अशा घटना घडत असतात. कित्येक तरूणींना हे सहन करावं लागतं. बीडच्या अंबाजोगाईत देखील अशीच एक घटना घडली आहे. ती घटना आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Crime News In Marathi)

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) शिक्षणाची पंढरी समजली जातेय. पण इथे आता महाविद्यालयीन तरूणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अंबाजोगाईत महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड काढत विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीडित तरूणी इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकते. तिच्याच गल्लीत राहणाऱ्या एका तरूणीने तिची छेड काढली (College girl Physically Assaulted) आहे. छेडछाड करत बळजबरीने तिचा हात त्या तरूणाने धरला. हात धरून तिला कॉफी शॉपमध्ये नेलं. मात्र, यावेळी तरुणीने आपली सुटका करत घर गाठलं.

या प्रकरामुळे पीडित तरूणी चांगलीच घाबरली होती. घडलेल्या प्रकारानंतर तिने धावतपळत घर गाठलं. (beed crime)

विशेष म्हणजे या (Beed Crime News) घटनेतील रोडरोमियो तरुण गेल्या 2 वर्षांपासून तरुणीची छेडछाड करत आहे. तो अश्लील हावभाव करून पीडित तरुणीला त्रास देत आहे.

सततचा त्रास असाह्य झाल्यामुळं पीडित तरुणीने घडलेला प्रकार तिच्या आईला (Girl Physically Assaulted) सांगितला. दरम्यान याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून रोडरोमिओ तरुणावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT