Beed Crime News: Saamtv
क्राईम

Beed Crime News: रुग्णालयात राडा... पार्किंगच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; १६ जणांवर गुन्हा दाखल

Beed Braking News: या प्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनेने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

विनोद जिरे

बीड|ता. २२ एप्रिल २०२४

बीडच्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पार्किंगवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनेने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या (Beed) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पार्किंगच्या वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री दोन पार्किंगवरुन वाद सुरू झाला आणि रुग्णालयातील अपघात विभागातच दोन गट भिडले.

रात्री 10 च्या दरम्यान घडलेला हा राडा जवळपास 10 ते 15 मिनिटे चालला. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर परिचारकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान रुग्णालयाचे सुरक्षारक्षक अन पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवले. याप्रकरणी दोन्ही गटातील 16 जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT