Beed Crime  Saam Tv
क्राईम

Beed Crime: क्लास सुटल्यावर माझ्या केबिनमध्ये ये...; २ शिक्षकांचे विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे, बीडमध्ये खळबळ

Beed Police: बीडमध्ये क्लासेसमध्येच दोन प्राध्यापकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या मुलीला क्लास सुटल्यावर आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिच्यासोबत अश्लिल चाळे केले. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये प्राध्यापकांनीच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासगी क्लासेसच्या २ प्राध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्राध्यापक सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या एका क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. बीड शहरातील नामांकित क्लासेसच्या दोन प्राध्यापकांनी विद्यार्थिनीसोबत हे धक्कादायक कृत्य केले. या प्रकरणी दोघांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध काद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे बीडमध्ये खळबळ उडाली. विजय पवार आणि प्रशांत खटावकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापकांची नावे आहेत.

१७ वर्षीय पीडित विद्यार्थिनी ही बीड येथील एका नामांकित खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत होती. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. जुलै २०२४ मध्ये क्लासमधील शिक्षक प्रशांत खटावकरने तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कक्षात बोलावून घेत तिच्याशी अश्लील चाळे केले. विद्यार्थिनीने ही बाब क्लासचे संचालक प्रा. विजय पवार यांना सांगितली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. मात्र पवार यांनी खटावकरला आळा घालण्याऐवजी स्वतः या विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील चाळे केले.

जुलै २०२४ पासून ते मे २०२५ पर्यंत दोन्ही आरोपी या विद्यार्थिनीचा विनयभंग करत होते. गुरूवारी पीडितेने दोघांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच दोन्ही आरोपी फरार आहेत.

या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत. विजय पवार हे कोचिंग क्लास संघटनेचे पदाधिकारी आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांची शैक्षणिक संस्था आहे. बीड शहरातील कोचिंग क्लासमधील त्यांचे मोठे नाव आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT