Beed Crime Saam Tv
क्राईम

Beed Crime: बीड हादरले! सासुरवाडीत जावयाची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

Beed Police: बीडमध्ये ३३ वर्षीय तरुणाची सासुरवाडीत निर्घृण हत्या करण्यात आली. डोकं, मान आणि पोटावर धारदार शस्त्राने अनेक वेळा वार करत संपवण्यात आले.

Priya More
  • बीडमध्ये ३३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

  • हा तरुण सासुरवाडीमध्ये राहत होता

  • शेतामध्ये जाता सांगून घराबाहेर पडला पण परत आलाच नाही

  • जुन्या वादातून हत्या झाल्याची चर्चा सुरू

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाची निर्घृण हत्या करण्यात आली. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे ही घटना घडली. ३३ वर्षीय तरुणाची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मृताच्या गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे ही घटना घडली. सासुरवाडीत राहणाऱ्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. तरुणाच्या गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वेळा वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. विकास दत्तात्रय वाघमोडे (रा. किट्टी आडगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. काही वर्षांपूर्वी त्याने तालखेड येथील अरुण नारायण राऊत गुरव यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता.

सासू-सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर विकास हा गेल्या ५ वर्षांपासून सासरी राहून त्यांच्या शेतीची देखभाल करत होता. रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शेतात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. त्यानंतर पत्नी आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. पण तो सापडला नाही. सोमवारी सकाळी तालखेडजवळील खंडोबा वडी परिसरात विकासचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहावरील जखमा पाहता तीक्ष्ण हत्याराने वार करून विकासची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. विकासची हत्या कुणी केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या घटनेमुळे तालखेड परिसरात खळबळ उडाली असून. जुन्या वादातून ही हत्याकांडाचीध झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणत्याही कारणाला दुजोरा दिलेला नाही. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT