Baramati Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : घटस्थापनेच्या दिवशी अघटित घडलं! देवीच्या उत्साहात तल्लीन असलेल्या पाच तरुणांवर जीवघेणा हल्ला

Baramati Crime News : बारामती तालुक्यातील वंजारवाडीत जुन्या भांडणातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली असून चौघे फरार आहेत.

Alisha Khedekar

  • बारामतीत घटस्थापनेच्या दिवशी हिंसक हल्ला

  • या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • याप्रकरणी सात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • पोलीस तपासात हा हल्ला जुन्या भांडणातून झाल्याचे समोर आले आहे.

बारामती तालुक्यातील वंजारवाडी मध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. घटस्थापनेदिवशी काल सायंकाळी रात्री साडेआठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर ही घटना घडली. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अमोल अण्णा चौधरी याच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने,शुभम वाघ आणि तेजस हजारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर शुभम वाघ,अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या हल्ल्यामध्ये सुनिल गोरख चौधर,अमोल आण्णा चौधर,भारत गोकुळ चौधर,सागर चंद्रकांत चौधर आणि आदित्य सर्जेराव चौधर हे पाच जण जखमी झाले आहेत.

पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार,सोमवारी २२ सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोल आण्णा चौधर,भारत गोकुळ चौधर,सागर चंद्रकांत चौधर,आदित्य सर्जेराव चौधर, सुनिल गोरख चौधर हे सर्व व इतर नवरात्र उत्सव चालु असल्याने देवीची ज्योत राशीन येथुन मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेउन आले. मंदिरासमोर पुजा पाठ करून पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करित होते. त्याचवेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली.

त्यातून मधुन ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने,शुभम वाघ आणि तेजस हजारे होते. त्यांच्या हातात लोखंडे कोणते चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती. त्यांनी दत्त मंदिरासमोर उभा असणाऱ्या फिर्यादी यासह त्यांच्या बंधुंवर हल्ला चढवला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

Onion: मातीमोल कांदा, खिशाला भुर्दंड; कांदा अजून किती दिवस शेतकऱ्याला रडवणार?

Shocking : हृदयद्रावक! आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या ३ नातींवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून मृत्यू

Petrol Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल 10 दिवसांत 7.50 रुपयांनी महागले, तुटवडा असतानाच दरवाढीचा भडका

सकाळच्या नाश्त्याचं टेन्शन मिटलं! रक्तातील साखर वाढू नये म्हणून खा 'हे' 5 पदार्थ

SCROLL FOR NEXT