bangalore crime news Saam tv
क्राईम

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 55.88 कोटींचे एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त

bangalore crime news : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 55.88 कोटींचे एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले.

Vishal Gangurde

पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई

55.88 कोटींचे एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त

55.88 कोटींचा मुद्देमाल जप्त

संजय गडदे, साम टीव्ही

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) महाराष्ट्रने कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे धडक कारवाई केली. या पथकाने एमडी ड्रग्ज तयार करणारे तीन अवैध कारखाने नष्ट केले आहेत. या कारवाईत तब्बल 55 कोटी 88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पथकाच्या देशव्यापी कारवाईने अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का बसला आहे.

कोकण पथकाने 21 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबईतील वाशी येथे 1.48 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर तपासाची सूत्रे बंगळुरूपर्यंत पोहोचली. तपासात प्रशांत यल्लापा पाटील याच्यासह अन्य आरोपींचा सहभाग उघड झालाय. बेंगळुरूतील तीन ठिकाणी छापे टाकून 21.4 किलो एमडी ड्रग्ज, यंत्रसामग्री आणि रसायने जप्त करत कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले.

या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. एमडी ड्रग्ज विक्रीतून आरोपींनी मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण आणि पुणे कृती गटाने ही कारवाई यशस्वी केली आहे.

पथकाची कारवाई कुठे करण्यात आली?

कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले.

या कारवाईत किती जणांना अटक करण्यात आली?

आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT