Andhra Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. एका व्यक्तीने आपल्या बायकोला खांबाला बांधून बेदम मारहाण केली. मुलांच्या समोर त्याने बायकोसोबत हे भयंकर कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

आंध्रप्रदेशमध्ये मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या बायकोला खांबाला बांधून बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीची लहान मुलं रडत होती आईला मारू नका असे ओरडत होती पण आरोपीने त्यांचा एकही शब्द ऐकला नाही. उलट तो बायकोला लाथा मारत राहिला. हा राक्षस बायकोसोबत भयंकर कृत्य करत राहिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बलराजू हा त्याची पहिली बायको भाग्यम्मासोबत तारलुपाडू मंडल येथे राहत होता आणि त्याला दुसरी बायको देखील आहे. तो त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत राहत होता. नुकताच तो गावी परत आला होता. बलराजू आजारी आहे आणि त्याने पहिल्या बायकोकडे उपचारासाठी पैसे देण्याची मागणी केली.

भाग्यम्माला चार मुलं आहेत आणि ती एकटीच त्यांची काळजी घेते. त्यामुळे तिने नवऱ्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या बालाराजूने बायकोला खांबाला बांधले आणि तिला बेल्टने जबर मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बालाराजूची मुलं आईला सोडा म्हणून रडत राहिली तरी देखील त्याने सोडले नाही. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बलराजूला संशय होता की त्याच्या बायकोचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत. यामुळे तो आणखी चिडला आणि त्याने बायकोला अमानुष मारहाण केली. ही घटना १३ सप्टेंबर रोजी घडली आणि १७ सप्टेंबरला जेव्हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा उघडकीस आली. या व्हिडीओवरून पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीसह चौघांना ताब्यात घेतले. आरोपी बलराजू सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT