Amravati Crime Saam Tv
क्राईम

Amravati Crime: 'तवा' बाबावर बलात्काराचा गुन्हा, मार्डीच्या आश्रमातील भयंकर प्रताप

Sexually Abused Case: अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amravati Crime News Mardi's Ashram

अमरावती जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी तवा बाबा (Gurudas Baba tava baba) चांगलाच प्रसिद्ध झाला होता. हा बाबा तापत्या तव्यावर बसला होता, भाविक दर्शन घेत होते, असा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर या व्हिडीओला चांगलीच प्रसिद्धी मिळत होती. हा बाबा अगदी कमी वेळेत लोकप्रिय होत होता. खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचत होता. याच बाबाचा आता भयंकर प्रताप समोर येत आहे. (latest crime news)

या बाबाचं खरं नाव सुनील कावलकर आहे. पण तो स्वत:ला गुरुदास बाबा म्हणवून घेतोय. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमात या बाबाचं वास्तव्य होतं. या बाबावर एका महिला भाविकाने लैगिंक शोषणाचा (Sexually Abused Case) आरोप केलाय. नक्की काय घटना घडली, ती आपण सविस्तर जाणून घेऊ या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिला भाविकाचे शोषण

गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर (Gurudas Baba) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील महिला भाविकाचं शोषण केलं. त्यानंतर तिचा व्हिडिओ बनवला, असा आरोप या महिला भाविकाने केला आहे. याप्रकरणी बाबावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका महिला भाविकाचा पती आजाराने त्रस्त होता. त्याला बरं वाटावं म्हणून उपचार घेण्यासाठी ही महिला आश्रमात ( Mardi's ashram Tiwasa) आली होती. जर तुझ्या पतीचा आजार बरा करायचा असंल, तर तुला आश्रमात थांबावं लागलं, असं बाबाने तिला सांगितलं होतं. अशी माहिती या पीडित महिलेनं (Amravati Crime) दिलीय.

कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुदास बाबा फरार झालाय. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे.

काही महिन्यापूर्वी याच बाबाचा तपत्या ताव्यावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला (Amravati Crime sexually Abused) होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT