Amravati Crime Saam tv
क्राईम

Amravati Crime: घरात घुसून सुवर्णकाराची हत्या; ७४ लाखाचा ऐवज लंपास

Amravati News : घरी कोणी नसतांना अज्ञात चोरट्याने घरात शिरून धारधार शस्त्राने मांडळे यांच्यावर वार केले

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: सुवर्ण व्यावसायिक असलेल्या इसमाच्या घरात घुसून भरदिवसा त्याची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर (Amravati) घरातून तब्बल ७४ लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे घडली आहे. या (Crime News) घटनेचा पोलीस तपस करत आहेत. (Maharashtra news)

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय मांडळे (वय ५४) असं मृतक सुवर्णकाराचे नाव आहे. मृतक मांडळे हे आपल्या राहत्या घरी होते. दरम्यान घरी कोणी नसतांना अज्ञात चोरट्याने घरात शिरून धारधार शस्त्राने मांडळे यांच्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घरातून ७४ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला.  या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२४ तासानंतरही आरोपी फरार 

सुवर्णकाराच्या घरात घुसून त्याची निर्घृणपणे हत्या करून अज्ञात आरोपिंनी सोने, चांदी व नगदी रोख रक्कमसह तब्बल ७४ लाखाचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली, तिवसा पोलिसांनी खुणासह चोरीचा गुन्हा केला. दरम्यान घटनास्थळी डॉग पथकासह जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन तपास सुरू केला. मात्र २४ तास घटनेला उलटूनही आरोपी अद्यापही फरार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT