अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. धरणांची पाणी पातळी खालावत असून नद्या देखील कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार अणे. यात मनमाड (Manmad) शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठायला सुरुवात केल्याने मनमाड शहरात देखील पाणी टंचाई जमविण्याची शक्यता आहे.
यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने धरण भरु शकले नाही, यामुळे अनेक ठिकाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात हि परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हीच परिस्थिती मनमाडला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी या धरणाची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सगळी भिस्त पालखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असून आजही मनमाड शहराला महिन्यातून केवळ एकादच पाणी पुरवठा होत आहे.
पाण्यासाठी करावी लागणार वणवण
पालखेड धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी पाटाला सोडण्यात आल्याने त्याचा फायदा आतापर्यंत झाला. मात्र सध्या धरणातील पाणी कमी झाले असून पालखेड मधिल आवर्तन जेव्हा सुटेल तेव्हाच ते वागदर्डी धरणात पंपिंग केले जाईल. तोपर्यंत महिन्यातून एकदाच शहरवासीयांना पाणी पुरवठा होणार आहे. तर आगामी उन्हाळ्यात दिवसात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मनमाडकर नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.