Mumbai Crime News Saam Digital
क्राईम

Amravati Crime: पतीने गाठली कौर्याची परिसीमा.. पत्नीला गॅसवर जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अमरावतीत खळबळ

Amravati Crime: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील कापुसतळणी गावात दारुड्या पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी|ता. १८ फेब्रुवारी २०२४

Amravati Breaking News:

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये पतीने कौर्याची परिसीमा गाठत पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून जखमी पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Crime News in Marathi)

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील कापुसतळणी गावात दारुड्या पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुकेश तिडके असे या नराधम पतीचे नाव आहे. तू कामाला जात नाहीस, तू बदमाश आहे, तू माझ्याजवळ राहू नको म्हणत पतीने पत्नीला गॅस वर पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत पत्नीचा पाय जळाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पीडित महिलेवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याचा आरोप पीडीत महिलेने केला आहे. या घटनेनंतर आरोपी पती मुकेश तिडकेविरुद्ध माहुली जहागिर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ..

नाशिकरोड (Nashik) येथील एकलहरा रोडच्या बाजूला एका युवकांचा हल्ला झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास एकलहरा रोड परिसरात असलेल्या किर्लोस्कर कंपनीच्या समोरच्या भागात रस्त्याच्या बाजूला हा मृतदेह आढलून आला पाठीवर, पोटावर धारदार हत्याराणे हल्ला करून हा मृतदेह टाकून देण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT