Amravati crime news  Saam Tv
क्राईम

Amravati Crime News : घात! 'त्या' १७ वर्षीय मुलीचं सख्ख्या मामाकडून लैंगिक शोषण, मावशीही आहे आरोपी

Crime News : अमरावतीच्या एका मठात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी गरोदर राहिल्याने खळबळ उडाली. तिच्यावर मठातल्या दोघांनी अत्याचार केल्याचे म्हटले जात आहे. यात नवी अपडेट समोर आली आहे. पीडितेच्या मामाने देखील तिचे शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Yash Shirke

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Amravati News : अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. अमरावतीच्या हरिद्वापूर येथील महानुभाव पंथाच्या आश्रमात एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मावशीसह दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी हा पीडितेचा सख्खा मामा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील सुरेंद्रमुनी तळेगावकर महाराजांच्या मठात सेवेकरी असणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपींनी अत्याचार केला. आरोपी मागील वर्षभरापासून पीडितेवर तळघरात अत्याचार करत होते. यात मुलीच्या मावशीने आरोपींना सहकार्य केले. पीडितेला ८ महिन्यांची गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच अल्पवयीन तरुणीच्या आईवडिलांनी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात सुरेंद्र मुनी आणी बाळकृष्ण देसाई या दोघांना अटक केली. शिवाय तरुणीच्या मावशीला देखील ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यानंतर मुलीच्या ३५ वर्षीय सख्ख्या मामानेदेखील तिचे शोषण केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी अत्याचार प्रकरणी आरोपींवर पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. चारही आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले आहे. दरम्यान मठामध्ये झालेल्या या किळसवाण्याप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Healthy Diet : फिटनेसाठी चपाती धोकादायक? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Building Collapse: इमारत दुर्घटनेप्रकरणी मालकाला अटक, उपायुक्तांसह ५ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Filmmaker Death : तेजस्वी तारा हरपला! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

HDFC बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा! कोट्यवधी खातेदारांचा 'ईएमआय' कमी होणार; जाणून घ्या नवीन दर

SCROLL FOR NEXT