Mumbai Crime News Saam tv
क्राईम

Lodha Amara Crime : फक्त २०० रुपयांसाठी जीव घेतला, कामगाराने डोक्यात हातोडा घालून मुकादमाला संपवलं; अंबरनाथमधील भयंकर घटना

Maharashtra Latest Crime News Updates: मजुरांना रोजचे ९०० रुपये मजुरी देण्याचं त्याने कबूल केलं होतं, मात्र प्रत्यक्षात तो त्यांना दिवसाची ७०० रुपयेच मजुरी देत होता.

Gangappa Pujari

अजय दुधाणे, अंबरनाथ|ता. १६ सप्टेंबर

Ambernath Crime News: मजुरी कमी दिल्याच्या रागातून मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. सलीम याकूब शेख असे या हत्या केलेल्या मजुराचे नाव असून अब्दुल रेहमान असे मृत मुकादमाचे नाव आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मजुराला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथ पूर्वेतील वडवली सेक्शनमध्ये एका इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर मुकादम अब्दुल रेहमान याने त्याच्या पश्चिम बंगालमधील गावाहून दोन मजूर कामासाठी आणले होते. हे नवे कामगार आणि मुकादम बांधकामाच्या ठिकाणीच एका गाळ्यात राहात होते. या मजुरांना रोजचे ९०० रुपये मजुरी देण्याचं त्याने कबूल केलं होतं, मात्र प्रत्यक्षात तो त्यांना दिवसाची ७०० रुपयेच मजुरी देत होता.

यावरुनच मुकादम आणि दोन कामगारांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की सलीम याकूब शेख या मजुराने मुकादम अब्दुल रेहमान याच्या डोक्यात हातोडा घातला. यात गंभीर जखमी झालेल्या अब्दुल रेहमानचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांसाह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मजूर सलीम याकूब शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: जालना पोलिसांची मोठी कारवाई, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांसह औषधांचा साठा जप्त

Weight Loss Bhakri Recipe : ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ; वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी फायदेशीर?

CM सुवेंदु अधिकारींचे पहिल्याच कॅबिनेटमध्ये 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सुसाट!

Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT