Akola Two Youths Commit Suicide Saam Tv News
क्राईम

Akola Crime : अकोल्यात दोन तरुणांनी आयुष्य संपवलं, एकाचं घरगुती कारणावरून टोकाचं पाऊल, तर दुसऱ्यानं...

Akola Crime News : ऋषिकेशने घरगुती कारणांवरून आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. तर गणेशच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या दोन्ही आत्महत्याच्या प्रकरणात अकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू केलाय.

Prashant Patil

अक्षय गवळी, साम टिव्ही

अकोला : अकोल्यात दोन तरुणांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या बोर्डी आणि रामापूर गावातील २३ ते २५ वयोगटातील तरुणांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. बोर्डी येथील ऋषिकेश वरणकार या २३ वर्षीय युवकाने त्याच्याच गायवाड्यात गळफास घेतलाय. तर रामापूर येथील २५ वर्षीय गणेश डाफे याने त्याच्याच जुन्या घरात आत्महत्या केली आहे.

दरम्यान, ऋषिकेशने घरगुती कारणांवरून आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. तर गणेशच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या दोन्ही आत्महत्याच्या प्रकरणात अकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू केलाय.

एकंदरीत ऋषिकेश वरणकर हा आपल्या मोठ्या भावाला शेतीच्या कामात हातभार द्यायचा, त्याचा स्वभाव अगदी मनमयाळू आणि प्रेमळ होता. आज सकाळीच ऋषिकेशचा घरातील काही सदस्यांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तो तणावात होता. याच कारणावरून त्याने घराजवळच असलेल्या गायवाड्यात आत्महत्या केली असावी. अशी प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तर गणेश डाफे याच्या आत्महत्येचं मूळ कारण कळू शकलं नाहीये. गणेश याच्या भावाचा दुधाचा व्यवसाय होता, तो भावाला दुधाच्या व्यवसायात मदतीला हातभार देत असायचा. मात्र, या दोघांच्या आत्महत्या मागील खरं कारण काय? याचा तपास अकोट ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजप-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार- मुरलीधर मोहोळ

Jeffrey Epstein Photo : ६८ फोटो अन् चॅट्स रिलीज, बिल गेट्स महिलांसोबत दिसले, एपस्टीन फाईल आज सार्वजनिक होणार

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Bank Holidays: कामाची बातमी! देशभरात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी; कारण काय?

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

SCROLL FOR NEXT