Akola Shocking  Saam tv
क्राईम

Shocking : आई गरबा पाहायला गेली, नराधम बापाने संधी साधली; घरात एकट्या असलेल्या ५ वर्षीय मुलीवर अत्याचार

Akola Shocking : आई गरबा पाहायला गेल्यानंतर नराधप सावत्र बापाने ५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

Saam Tv

सावत्र बापाकडून ५ वर्षीय मुलीवर अत्याचार

खदान पोलीस स्टेशन हद्दीतील हा धक्कादायक प्रकार

सावत्र बापाला काही तासांतच अटक

अकोला शहर परिसरात संतापाची लाट

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अकोल्यात सावत्र बापाने ५ वर्षीय मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर नराधम बापाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. अकोल्यामधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील एका नराधम सावत्र बापाने स्वत:च्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. खदान पोलीस स्टेशन हद्दीतील हा संपूर्ण प्रकार घडला. अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला काही तासांतच अटक केली

...अन् नराधमाने संधी साधली

आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती. याचीच संधी साधून सावत्र बापाने स्वत:च्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. पोट जास्त दुखू लागल्याने मुलीने आईला घरी परतल्यानंतर सर्व प्रकार सांगितला. आईने मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आलाय.

पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अत्याचार झाल्याची पुष्टी केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सावत्र बापावर तात्काळ कारवाई केली. आरोपीवर विविध कलमान्वये आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातर्गंत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

पीडित मुलीवर उपाचार करून तिचे समुपदेशनही करण्यात येत आहे. अकोला शहरातील या घटनेने परिसरात संतापाती लाट पसरली आहे. आरोपी सावत्र बापावर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT