अहमदाबादमधील शाळेत विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली
सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
गुजरातमधील अहमदबाद एका आत्महत्येच्या घटनेमुळे चर्चेत आले आहे. येथील नवरंपुरा भागातील एका शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीनं चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलीय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आलीय. या घटनेला हिंदी चित्रपट 'सैयारा' शी जोडून पाहिलं जात आहे. हा सैयारा चित्रपटाचा परिणाम आहे. असल्या चित्रपटांवर बंदी घातली पाहिजे, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.
दरम्यान शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी १२:३० च्या सुमारास विद्यार्थी लॉबीमध्ये चालताना हाताच्या बोटावर किचेन रिंग फिरवताना दिसतेय. नंतर ती रेलिंगच्या दिशेने गेली. समोरच काही विद्यार्थी होते. त्यांना काही समजण्याच्या आतच ती अचानक रेलिंगवर चढली आणि खाली उडी घेतली. चित्रपटातील हिरो-हिरोईन प्रमाणे वॉकिंग स्टाईल. स्वॅगनं हाताच्या बोटावर चावी फिरवत शाळेच्या गॅलरीतून चालतेय. नंतर अचानक गॅलरीच्या रेलिंगवरून चढून कोणाला काही कळण्याआधी चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेने अहमदाबादमध्ये खळबळ उडलीय.
शाळेचे व्यवस्थापक प्रग्नेश शास्त्री यांनी सांगितलं की, ही विद्यार्थिनी ५ वर्षांपासून या शाळेत शिकत आहे. एका महिन्याच्या सुटीनंतर तिनं शाळेत येण्यास सुरुवात केली होती. ती दहा दिवसांपूर्वीच शाळेत पुन्हा आली. तिने शाळेत आपले वैद्यकीय प्रमाणपत्रही जमा केलं होतं. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी सकाळी तिला शाळेत सोडले होते. वर्ग सुरू असताना तिने अचानक ओरडायला सुरुवात केली.
शिक्षकांनी तिला शांत बसवलं होतं. या प्रकरणी नवरंगपुरा पोलिसांनी नोंद केली आहे. पोलिसांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहत. ज्यामध्ये मुलीचे शेवटचे क्षण स्पष्टपणे दिसत आहेत. दरम्यान या घटनेला सैयारा चित्रपटाशी जोडलं जात आहे. एका सोशल मीडिया युजरनं दावा केलाय की, अशा चित्रपटांमुळे मुलांची मानसिक स्थिती नाजूक होत आहे. सैयारासारख्या चित्रपटांमुळे मुलांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते आणि ते असे टोकाचे निर्णय घेतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.