Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : नवरा तुरुंगात, बाहेर सूत जुळलं, त्यानेच घात केला, कोयत्याने सपासप वार केले अन्..

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. त्याने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शिर धडावेगळे केले.

Yash Shirke

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अनैतिक संबंधातून झालेल्या वादात प्रियकराने त्याच्या प्रेयसीची हत्या केली आहे. आरोपीने कोयत्याचे वार करुन प्रेयसीचे शिर धडावेगळे केले. हत्या केल्यानंतर प्रियकराने पोलीस ठाण्यात जाऊन केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली. ही घटना अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारामध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव सोनाली जाधन (वय २८) असे आहे. सोनाली पुणे जिल्ह्यातील पोखरी येथे राहत होती. तिचा पती सात वर्षांपासून तुरुगांत होता. याच दरम्यान तिचे सखाराम वालकोळी (वय ५३) याच्याशी सुत जुळले. दोघेजण काही काळ एकत्र राहत होते.

पुढे सोनालीचा नवरा तुरुंगातून सुटून आला आणि तिने सखारामची साथ सोडली. ती नवऱ्यासोबत राहू लागली. त्यानंतर तिने सखारामला धमक्या द्यायला सुरुवात केली. मला तुझ्याकडे यायचे आहे, तू मला सांभाळले नाही, तर मी तुला सोडणार नाही. तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करेन अशी धमकी सोनाली देऊ लागली. यामुळे आरोपी सखाराम वालकोळी वैतागला.

१९ फेब्रुवारी रोजी सोनाली आणि सखाराम हे दोघे अहिल्यानगर बस स्थानकावर भेटले. पुढे ते दोघे वांबोरी तेथील महादेव मंदिराच्या डोंगराजवळ गेले. शिवारात गप्प मारताना त्यांच्यात वाद झाला. सखारामने सोनालीला लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली. कोयत्याने वार करत त्याने सोनालीचे शिर धडावेगळे केले.

हत्या केल्यानंतर आरोपी वांबोरी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. या हत्या प्रकरणात आरोपी सखाराम वालकोळी याच्या विरोधात बीएनएस कलम १०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Repo Rate: होम लोन आणखी स्वस्त होणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

SCROLL FOR NEXT