Adharwadi Jail Saam TV
क्राईम

Adharwadi Jail : आधारवाडी कारागृहात CCTV कॅमेऱ्यांसह, टेलीफोन अन् ई-मुलाखतीची सुविधा

kalyan News : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यांना महिन्यातून एकवेळा कुटुंबासोबत आणि एकवेळा वकिलासोबत बोलता येणार आहे. राज्यातील जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

kalyan Adharwadi Jail :

कल्याणमधील आधारवाडी कारागृहातील कैद्यांबाबत एक महत्वची बातमी समोर आली आहे. कल्याणमधील आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प, कॉइन बॉक्स सुविधा, व्हिडियो कॉन्फरन्स, ई मुलाखत युनिट, इ लायब्ररी या नाविन्यपूर्ण सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे कैद्यांच्या सुविधेत आणखी वाढ झाली

आहे.

अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज या सर्व सुविधांचे उदघाटन करण्यात आले. कॉईन बॉक्स सुविधेअंतर्गत आठवड्याला प्रत्येक कैद्याला तीन कॉल मिळणार आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यांना महिन्यातून एकवेळा कुटुंबासोबत आणि एकवेळा वकिलासोबत बोलता येणार आहे. राज्यातील जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ई लायब्ररीमुळे ही लायब्ररी अपडेट करता येईल आणि याचा जास्तीत जास्त लाभ कैद्यांना मिळेल.

जेलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जेलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेत. त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. यावेळी जेलच्या दुरावस्थेबाबत बोलताना गुप्ता यांनी पीडब्ल्यूडी पाठपुरावा सुरु आहे असं सांगितलं.

आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत, याबाबत बोलताना अमिताभ गुप्ता यांनी पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात झाल्याचे यालेळी सांगितले. ते काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताण कमी होईल कमी होईल असेही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT