Jijau Multistate Bank Scam beed saam Tv
क्राईम

Jijau Multi state Bank Scam: अबब ! पोलिसाच्या घरात कोट्यावधींचं घबाड; लाचलुचपत खात्याची मोठी कारवाई

Beed News: बीडमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकाकडे कोट्यावधींचं घबाड सापडलंय. त्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता किती हे पाहून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. बघूया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

बीड: जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट बँकेत घोटाळा झाला. बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटच्या घोटाळ्यात एका व्यापाऱ्यास आरोपी न करण्यासाठी एक कोटीच्या लाचेची मागणी करणाऱ्याच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड टाकली. हरिभाऊ खाडे असं घरावर धाड पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या घरावर पडलेल्या धाडीत कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. सध्या तो फरार आहे.

बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये काही दिवसांपूर्वी घोटाळा झाला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. यामध्ये एका व्यापाऱ्याच्या खात्यावर 60 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती. त्याच्यासह त्याच्या दुसऱ्या सहकार्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेनं 1 कोटींची लाज मागितली होती. याप्रकरणी खाडेच्या घरावर धाड टाकण्यात आली.

पोलिसाच्या घरात कोट्यावधींचं घबाड

पोलिस अधिकाऱ्याची मालमत्ता

1 कोटी 8 लाख रुपये रोख

72 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने

4 लाख 62 हजार रुपयांची साडेपाच किलो चांदी

बारामतीत-इंदापूरमध्ये फ्लॅट

इंदापूर येथे व्यापारी गाळा

बारामती आणि परळीत प्लॉट , अशी स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळली.

घोटाळा झाल्यावर त्याचे धागेदोरे शोधून गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत अडकवण्याचं काम पोलीस करत असतात,मात्र बीडमधील पीआय खाडेनं पोलिस तपास यंत्रणेवरच नाही तर खाकीवरही डाग लावलाय. घोटाळे करणारे दोषी आहेतच मात्र त्यांचे घोटाळे दाबणारे आणि त्याचा मलिदा खाणारे त्याहून दोषी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

SCROLL FOR NEXT