क्राईम

Nashik Railway Crime: रेल्वेत दोन गटात तुफान हाणामारी, बसण्याच्या जागेवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू

Nashik Railway Crime News: निफाडजवळ खेरवाडी रेल्वे स्थानकावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत घटना घडली आहे. रेल्वेमध्ये हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Dhanshri Shintre

रेल्वेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची बातमी समोर आली आहे. बसण्याच्या जागेवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. निफाडजवळ खेरवाडी रेल्वे स्थानकावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत ही घटना घडली आहे. रेल्वेमध्ये हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. खेरवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून दोन ते तीन गाड्या थांबवण्यात आल्याची देखील माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे.

मुंबईला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या तरुणांवर चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी रेल रोको केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा येथील काही तरुण हे मुंबईला राज्यराणी एक्सप्रेसने अभिवादन करण्यासाठी जात असताना निफाड ते खेरवाडी दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत त्यांच्यावर चाकू हल्ला केला व खेरवाडी रेल्वे स्थानकावर चैन पूलिंग करून पळ काढला.

संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत गाडी जाणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे राज्यराणी व सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या खेरवाडी स्थानकात खोळंम्बल्या आहेत. उद्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातील लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात.

पाच तारखेपासूनच हे सर्व जण यायला सुरुवात होते. मराठवाडा येथील काही तरुण आज राज्यराणी एक्सप्रेसने जात असतानाच निफाड ते खेरवाडी दरम्यान काही चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले. त्यांना विरोध केला असता त्यांनी या तरुणांवर चाकूने हल्ला केला. यात तरुण जखमी झाले आहेत.

मात्र या सगळया गडबडीत या चोरट्यांनी खेरवाडी स्थानक येताच चैन पूलिंग केली व पळ काढला. मात्र संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे या स्थानकात राज्यराणी सेवाग्राम या गाड्या खोळंम्बल्या आहेत. यामुळे रोज अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT