8 dacoits looted devotees from nanded in sangli Saam Digital
क्राईम

Sangli Robbery : अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सांगलीजवळ दराेडेखाेरांनी लुटले, थरकाप उडवणारी घटना

Sangli Crime News रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील मिरज तालुक्यातल्या कळंबी येथे एका पेट्रोल पंपावर हे सर्व जण रात्री विश्रांतीसाठी थांबले.

विजय पाटील

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सांगलीच्या कळंबी येथे लुटल्याचा प्रकार समाेर आला आहे. सुमारे सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत नांदेड जिल्ह्यातील भाविकांना लुटले आहे. त्यांच्याकडील पैसे, दागिन्यांवर दराेडेखाेरांनी डल्ला मारला. मिरज पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथील चंद्रकांत बाईंगडे आणि बाळजी पाटील हे आपल्या कुटुंबासह एका गाडीतून तुळजापूर, पंढरपूर दर्शन करून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले हाेते. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील मिरज तालुक्यातल्या कळंबी येथे एका पेट्रोल पंपावर हे सर्व जण रात्री विश्रांतीसाठी थांबले.

याच दरम्यान रात्री एकच्या सुमारास अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी येऊन बाईंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली आहे. या दरम्यान दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cup 2027: रोहित-कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? काय म्हणाला कर्णधार गिल?

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Hair Care: केमिकल ट्रिटमेंटपेक्षा घरात तयार केलेलं 'हे' तेल केसांना लावा, डँडरफपासून ते हेअर फॉलपर्यंत सगळ्या समस्या होतील दूर

Team India च्या महिला संघामध्ये सर्वात जास्त शिव्या कोण देतं? कर्णधार हरमनप्रीत कौरचं उत्तर ऐकून आश्चर्यचकीत व्हाल

Santragachi Express : संतरागाछी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; पॅंटरीकार कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचे भांडण झाल्यानंतरचा प्रकार, पथकाकडून तपासणी

SCROLL FOR NEXT