Mumbai Crime News Trombay Police Station/File
Mumbai Crime News Trombay Police Station/File SAAM TV
क्राईम

Mumbai Crime : ६४ वर्षीय वृद्ध महिलेवर मानखुर्दमध्ये रात्रभर अत्याचार, सकाळी चेंबूरमध्ये घराबाहेर फेकलं

Saam Tv

Mumbai Crime News :

मुंबईतील मानखुर्दमध्ये धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ३८ वर्षीय तरुणाने ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर यापूर्वीही बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. (Latest Marathi News)

पीडित ६४ वर्षीय महिला चेंबूरमध्ये (Chembur) राहते. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ती आपल्या घरी जात होती. त्याचवेळी वाटेत आरोपी भेटला. घरी सोडतो अशा भूलथापा देत आरोपीने तिला लिफ्ट दिली. उशीर झाल्याने महिलाही त्याच्यासोबत जायला तयार झाली. महिलेला चेंबूरला न सोडता त्याने मानखुर्दमध्ये स्वतःच्या घरी नेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरी नेऊन त्याने महिलेला मारहाण केली. त्यानंतर रात्रभर तिच्यावर अत्याचार (Crime News) केले. आरोपीने दुसऱ्या दिवशी सकाळी तिला चेंबूर (Chembur) येथे तिच्या घराबाहेर फेकून पळ काढला. ही महिला विवस्त्रावस्थेत घराबाहेर पडली होती. जखमी अवस्थेत घराबाहेर पडलेल्या महिलेला शेजाऱ्यांनी बघितलं. त्यांनी याबाबत तातडीने ट्रॉम्बे पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच, ट्रॉम्बे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पीडितेला तात्काळ रुग्णालयात (Hospitalised) दाखल केले. पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी उमेशला अटक (Arrest) केली. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने (Court) त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Today's Marathi News Live: मान्सून आज अंदमानात दाखल होणार, महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळणार

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

Pune Metro News: पुणेकरांसांठी गुडन्यूज! फक्त १०० रुपयांचा पास अन् मेट्रोने करा दिवसभर प्रवास; काय आहे नवी योजना?

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT