mumbai crime news google
क्राईम

Crime : जालना हादरलं! भर दिवसा ५० वर्षीय व्यक्तीला चाकूने भोसकलं, जीव घेतल्यानंतर हल्लेखोर पोलिसात

jalna crime News : जालना शहरातील गायत्री नगर परिसरातील ५० वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पैशाच्या देवाण घेवाणीतून खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे, साम टीव्ही प्रतिनिधी

jalna News Update : जालन्यात भर दिवसा एका 50 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आलाय. रमेश राख असं मयत व्यक्तीचे नाव आहे. जालना शहरातील गायत्री नगर परिसरामध्ये आज सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडलीय. आरोपीने खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान घटनास्थळी जालन्यातील सदर बाजार पोलीस दाखल झाले असून पुढील तपास आता पोलीस करत आहे.

जालना शहर हादरलं

जालन्यात भर दिवसा एका 50 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून निर्घृण खून खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जालना शहरामध्ये एकच खळबळ उडाली. पैशाच्या देवाण-घेवाणीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर

जालना शहरातील गायत्री नगर परिसरामध्ये एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर संशयित आरोपी हा स्वत:हून जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला.

पैशाच्या देवाण घेवाणीतून खून झाल्याचा संशय

जालन्यात एका 50 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने हा खून नेमकी का केला याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी हा खून पैशाच्या देवाण-घेवाणीतूनच झाला असावा असा संशय पोलिसांना आहे.

सदर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल

जालना शहरातील गायत्री नगर परिसरामध्ये खुनाची घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला यानंतर जालन्यातील सदर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास आता पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

Mangalsutra Designs: मगंळसुत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीत खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT