Crime News saam Digital
क्राईम

Uttar Pradesh Crime : शेतात प्रियकरासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं; पतीचं भयंकर कृत्य

Crime News: पत्नीला शेतात प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यानं रागाच्या भरात पतीनं तिला जिवंत पेटवल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Extra Marital Affairs Crime Case :

पत्नीला शेतात प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यानं रागाच्या भरात पतीनं तिला जिवंत पेटवल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात घडली. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावाजवळच्या शेतात शनिवारी रात्री उशिरा ३५ वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. पतीनं तिला जिवंत जाळल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी नेपाळ सिंहच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

रिपोर्टनुसार, आरोपीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पत्नीचे अन्य व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. शनिवारी मध्यरात्री तो झोपेतून जागा झाला. पत्नी घरात कुठेच दिसली नाही. तिचा शोध घेतला. गावाजवळच्या शेतात पत्नीला परपुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितलं. ती व्यक्ती तिथून पळाली. रागाच्या भरात त्याने 'पराली' पेटवून दिली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT