Chanakya Niti : पती पत्नीने या चुका कधीच करु नये; अन्यथा संसार होईल उद्धवस्त

Chanakya Niti : पती पत्नीच्या नात्यात नेहमी विश्वास असावा असे चाणक्य यांनी सांगितले आहे.
Chanakya Niti
Chanakya NitiSaam Tv
Published On

Chanakya Niti On Relationship:

चाणक्य नेहमीच माणसाच्या प्रगतीसाठी सल्ले देत असतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अंगी बाळगल्या तर खूप फायदा होईल. चाणक्य सर्व विषयांवर आपले मत मांडतात. त्यांनी पती पत्नीच्या नात्यात नेहमी विश्वास असावा असे सांगितले आहे. पती पत्नीच्या नात्यात कोणी एकाने जरी चूक केली तर संपूर्ण संसार मोडू शकतो असे ते म्हणतात.

ज्या घरात पती पत्नीमध्ये समन्वय, संवाद नाही, त्या घरात कधीही लक्ष्मी नांदत नाही, असे ते म्हणतात. अशा वेळी संसार सुखी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. सुखी संसारासाठी चाणक्य यांनी काही सल्ले दिले आहेत.

1. एकमेकांचा आदर करावा

पती पत्नीच्या नात्यात नेहमी आदर असावा. ज्या नात्यात आदर नाही तो संसार जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे प्रेम नाहीसे होते. अशा लग्नात कोणीही सुखी राहत नाही. पती किंवा पत्नीच्या एका चुकीमुळे सर्व संसार मोडतो. आयुष्यभर एकमेकांचा आदर करायला हवा. त्यामुळे नातं खूप काळ टिकतं.

2. काळजी घेणे

पती पत्नीने नेहमी एकमेकांची काळजी घ्यायला हवी. जेव्हा ते एकमेकांची काळजी घेणार तेव्हाच संपूर्ण कुटुंब सुखी राहिल. ज्या नात्यात आदर, विश्वास आणि काळजी नाही ते फक्त नावापुरतं मर्यादित असते. त्यामुळे कधीही कोणाची फसवणूक करु नये. एकमेकांसाठी एकनिष्ठ असावे.

Chanakya Niti
Resume Format Tips: मुलाखतीसाठी आकर्षक रेझ्युम हवा? 'या' व्हॉट्सअप क्रमांकावर फक्त पाठवा 'Hi', जाणून घ्या संपूर्ण माहिती

3. गोष्टी शेअर कराव्यात

पती पत्नीने सर्व काही एकमेकांशी शेअर करावे. कधीही कोणत्याही गोष्टी एकमेकांपासून लपवू नये. गोष्टी लपवल्याने नात्यात दुरावा येतो. विश्वास नाहीसा होतो. लहान-सहान गोष्टींवरुन भांडणे होतात. त्यामुळे लग्न मोडते.

Chanakya Niti
Xiaomi घेऊन येत आहे जबरदस्त कार, कमी किंमतीत मिळणार लक्झरी फीचर्स; जाणून घ्या किंमत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com