Crime News X
क्राईम

Crime : लग्नाच्या मंडपात खेळत होती ३ वर्षांची चिमुरडी, मिठाईचं आमिष दाखवत पळवलं, अत्याचार केल्यानंतर संपवलं

Crime News : आईवडिलांसह नातेवाईकांच्या लग्नाला आलेल्या एका ३ वर्षांच्या मुलीला एका नराधमाने आमिष दाखवले, निर्जन जागी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर मुलीची गळा आवळून हत्या केली.

Yash Shirke

Shocking News : एका तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी आलेल्या चिमुकलीला मिठाईचे आमिष दाखवून आरोपीने निर्जन ठिकाणी नेले. तिच्यावर अत्याचार केले, गळा दाबून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मायलावरम मंडल येथील कंबलादिन्ने या गावात ही घटना घडली आहे. तीन वर्षांची मुलगी तिच्या आईवडिलांसह लग्नासाठी कंबलादिन्ने गावात आली होती. लग्नमंडपाच्या शेजारी खेळत ही मुलगी खेळत होती. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिला मिठाईचे आमिष दाखवले आणि चिमुकलीला सोबत येण्यास सांगितले.

मिठाईचे आमिष दाखवत लहान मुलीला गावातील एका निर्जन जागी नेले. आरोपीने तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला. आरोपीने अमानुष कृत्य केल्यानंतर मुलीला मृतदेह काटेरी झुडपात फेकून दिला. गावातल्या लोकांना मुलीचा मृतदेह आढळला. पोलीस येण्याआधी गावकऱ्यांनी आरोपीला शोधून काढले.

३ वर्षांच्या मुलीचा मृतदेह काटेरी झुडपांमध्ये आढळल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मायलावरम मंडल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT