Solapur Crime News Saam tv
क्राईम

Solapur Crime News : सोलापुरात मध्यरात्री तरुणासोबत घडलं भयकर कांड, अज्ञाताने डोक्यात दगड घालून केली हत्या

Solapur youth killing case : सोलापुरात मध्यरात्री तरुणासोबत भयानक कांड घडलं आहे. सोलापुरात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुरात तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलपुरात २६ वर्षीय तरुणाची अज्ञात कारणाने डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री ही हत्येची घटना घडली आहे. जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात ही घटना घडली आहे. या हत्येच्या घटनेने सोलापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात मध्यरात्री हत्येची घटना घडली आहे. या परिसरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. विनायक हाके असे मृत तरुणाचे नाव आहे. विनायक हाके हा मूळचा मोहोळचा रहिवाशी आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापुरात त्याच्या आजीकडे आला होता. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तरुणाच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मोहोळमध्ये राहणारा विनायक त्याच्या मूळगावी सोलापूरला आजीकडे आला होता. आजीकडे आलेल्या विनायकची रविवारी मध्यरात्री अज्ञात कारणाने डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात घडलेल्या भयंकर घटनेने परिसरात एकच उडाली आहे.

विनायकच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. विनायकचा मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पंचनाम्यासाठी रवाना करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांकडून नव्या भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद होणार आहे.

मुलुंडमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

मुंबईच्या मुलुंड पश्चिम भागात एका १७ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना शनिवारी घडली. गुटखा खाण्यास पैसे दिले नाही म्हणून त्याचा वाद झाला होता. हुसेन ताज हुसैन खान असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT