wardha crime news  Saam Tv
क्राईम

Wardha Crime News: वर्धा हादरलं! घरगुती वाद विकोपाला गेला, रागाच्या भरात भाच्याने मामाला संपवलं

Vishal Gangurde

चेतन व्यास, वर्धा

Wardha Latest Crime News :

वर्ध्यात राहणाऱ्या मामा-भाच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या घरगुती मुद्द्यांवरुन वाद होत होते. एक दिवस हा वाद विकोपाला गेला. भाच्याने चक्क मामाच्या डोक्यावर विटेने प्रहार करीत जबर मारहाण केलीय. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. प्रकाश देवराव मसराम असे मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात आरोपी खुशाल राजू तुमडाम (२५) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

आरोपी खुशाल आणि मृतक प्रकाश हे दोघेही मामा-भाचे आहेत. हिंगणघाटच्या इंदिरानगर येथील एकाच घरात राहत होते. दोघांमध्ये नेहमी घरगुती वाद होत होते. याच घरगुती वादातून ९ जानेवारी रोजी आरोपी खुशालने मामा प्रकाशच्या डोक्यावर विटेने गंभीर प्रहार करुन त्यास रक्तबंबाळ केले. मात्र, उपचारादरम्यान मामा प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाशची पत्नी कांता हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी खुशालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी खुशालने प्रकाश मसराम याच्या डोक्यावर विटेने मारहाण केली. मामा प्रकाशला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून खुशालला घाबरगुंडी सुटल्याने स्वत:ला वाचविण्यासाठी त्याने स्वत:च प्रकाशला उपजिल्हा रुग्णालयात नेले आणि प्रकाश हा दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकाश यांना प्राथमिक उपचारानंतर तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले मात्र, प्रकृती नाजूक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मामाच्या मुलाला दिली ठार मारण्याची धमकी

खुशालने मामा प्रकाशच्या डोक्यावर विटेने मारहाण केल्याची घटना प्रकाशच्या मुलाने डोळ्याने पाहिली होती. मात्र, खुशालने ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यामुळे प्रकाशचा मुलगा घाबरला होता. मात्र, वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने मोठे धाडस करीत याची माहिती आईला सांगितली. त्यानंतर प्रकाशची पत्नी कांता हिने याप्रकरणाची तक्रार दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech: समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध रहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात!

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

SCROLL FOR NEXT