Raigad Young Girl Death  Saam Tv News
क्राईम

Raigad News : पाण्याचा कॉक बंद करण्यासाठी टेरेसवर गेली अन् आक्रित घडलं, चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा अंत

Raigad Young Girl Death : रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चार मजली इमारतीच्या टेरेसवरुन कोसळून या २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

Prashant Patil

रायगड : इमारतीच्या टेरेसवरुन कोसळून एका २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चार मजली इमारतीच्या टेरेसवरुन कोसळून या २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. याबाबतची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रिया किशोर चौधरी (वय २०, समर्थ रामदास अपार्टमेंट, महाड) ही तरुणी राहत होती. काल २६ जून २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिया चौधरी ही तरुणी इमारतीमध्ये येणारे बोरींगच्या पाण्याचा जल वहिनीचा कॉक बंद करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली होती. त्यावेळी रिया हिचा तोल गेला आणि ती इमारतीच्या छतावरून खाली डकमध्ये पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबाने तिला तातडीनं महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, महाड ग्रामीण रुग्णालयात असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिया चौधरी हिला तपासून मृत घोषित केलं. रिया चौधरी ही इमारतीवरून पडल्यानं तिच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं तरुणीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी उघड होतील. अशी माहिती महाड शहर पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

या घटनेची माहिती महाड शहर पोलीस ठाण्यात भावेश रमेश मोरे(वय ४५, समर्थ रामदास अपार्टमेंट, महाड) यांनी दिली असून याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT