Chhatrapati Sambhajinagar Crime News  Saam TV
क्राईम

Sambhajinagar News: मित्रानेच केला घात, छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मित्रानेच लैंगिक अत्याचार केला आहे.

Satish Daud

Chhatrapati Sambhajinagar Crime News

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मित्रानेच लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नितीन वाघ असं अत्याचार करणाऱ्या (Crime News) आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन आणि पीडित मुलीची १५ दिवसांपूर्वी ओळख झाली होती. पीडितेला विश्वासात घेऊन आरोपीने तिला उस्मानपुऱ्यातील येथील एका कॅफेवर भेटण्यासाठी बोलावले.

पीडिता कॅफेवर गेली असता, आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. यावेळी आरोपीने पीडितेचे अश्लील फोटोही काढले. याच फोटोंच्या आधारे आरोपीने पीडितेला धमकावत सातारा परिसरातील एका हॉटेलात बोलावून घेतलं.

तिथे आरोपी नितीन याने पीडितेवर दुसऱ्यांदा लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने घडलेल्या प्रकार आईला सांगितला. आईने तिला धीर देत रविवारी (३१ डिसेंबर) सातारा पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी नितीन वाघ याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सोमवारी नितीनला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. या घटनेमुळे परिसर संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT