Kerala Crime : "बॉयफ्रेंडला iPhone घ्यायचा होता..." १३ वर्षांच्या नातीने केली आजोबांना संपवलं; पोलीसही चक्रावले meta ai
क्राईम

Kerala Crime : "बॉयफ्रेंडला iPhone घ्यायचा होता..." १३ वर्षांच्या नातीने आजोबांना संपवलं; पोलीसही चक्रावले

Kerala Crime Story 13 year old girl killed grandfather : केरळच्या अप्पलझुवा परिसरात 13 वर्षाच्या नातीने बॉयफ्रेंडच्या मदतीने वृद्ध आजोबांची गळा दाबून हत्या केली. बॉयफेंडला आयफोन आणि बाईक देण्यासाठी घरातील दागिने देखील चोरी केले.

Saam Tv

नात आणि आजोबा यांच्या नात्याला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. केरळच्या अलाप्पुझा परिसरात मनात साचलेल्या रागामुळे 13 वर्षीय नातीने बॉयफ्रेंडच्या मदतीने आजोबांची हत्या केली आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अखेर चार दिवसानंतर पोलिसांना या हत्त्येचा छडा लागला असून 13 वर्षाची मुलगी तिचा 17 वर्षाचा बॉयफ्रेंड आणि इतर दोन साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .

केरळच्या अलाप्पुझा परिसरात शनिवारी सकाळी शिवनकुट्टी चेट्टियार ( 67 ) या वृद्धाची हत्या झाली होती. वृद्ध त्याची पत्नी, मुलगी आणि नातीसोबत राहत होता. घरात कोणी नसताना हात पाय बांधून या वृद्धाची हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासात चोरीच्या कारणास्तव वृद्धाची हत्या केली गेली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. परंतु काही दिवसांनी या प्रकरणात एक वळण मिळालं. ज्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. नातेवाईकांनी स्थानिकांनी दिलेल्या जबाब आणि नातीच्या जबाबात पोलि‍सांना तफावत जाणवली आणि सुरू झाला कोल्ड ब्लडेड केसचा उलघडा.

या 13 वर्षांच्या मुलीचा 17 वर्षीय बॉयफ्रेंड होता आणि हे तिच्या आजोबांना समजले होते. यावरून आजोबा आणि नातीत अनेक वाद व्हायचे. यातूनच आजोबांनी नातीकडील मोबाईल हिसकावून घेतला होता. याचाच राग त्या मुलीच्या मनात खदखदत होता. आजोबा आपल्याला बॅड टच करतात अशा अनेक गोष्टी ती बॉयफ्रेंडला सांगायची. यातूनच त्या दोघांचा आजोबांचा काटा काढायचा प्लॅन ठरला. शिवाय घरातले दागिने देखील लंपास करायचे म्हणजे लूटमारीत वृद्धाचा मृत्यू झाला असे समोर येईल. याच दागिन्यातून ती बॉयफ्रेंडसाठी आयफोन आणि बाईक घेणार होती. असे पोलिसांनी स्पष्ट केले.

हत्येच्या वेळी घरात कोणीही नव्हते. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी राहिली होती. मागच्या दारांनी मुल घरात घुसली आणि वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आली. दागिने लंपास करण्यात आले. हा सगळा प्रकार मुलगी व्हिडिओ कॉलवर बघत होती.

पोलिसांचा प्राथमिक संशय नातेवाईक आणि गावातील लोकांवर होता. परुंतु मुलीचे वागणे आणि तिने दिलेला जबाब यात प्रचंड तफावत आढळली. इतर पुरावे आणि फोन रेकॉर्डसच्याआधारे मुलगीच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले.सायबर पोलिसांच्या मदतीने 24 तासांच्या आत मुलीचा बॉयफ्रेंड आणि इतर साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या आरोपींना बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

SCROLL FOR NEXT