Pune Crime google
क्राईम

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Pune Crime: पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Dhanshri Shintre

पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ११७९ जणांना अटक करत ५ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. अवैधरित्या दारूची विक्री आणि ट्रान्सपोर्ट करणाऱ्यांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर आहेत. १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात १८ ठिकाणी चेक नाके उभारत आणि छापेमारी करत कारवाई केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 48 तास शिल्लक आहेत. या दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी ११७९ जणांना अटक करत ५ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात दारु विक्रीत मोठी वाढ होते. अनेकदा परराज्य, जिल्ह्यातून अवैधरित्या दारु वाहतूक होण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूनृमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १८ तात्पूरते चेकनाके उभारुन कारवाई केली जात आहे.

सदर व्यक्तींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येत असून, आतापर्यंत १२ प्रकरणांत ११ लाख ८० हजार रुपये इतक्या रकमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. दरम्यान या काळात गोवा राज्यनिर्मिती मद्याचे तीन गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यांमध्ये ४१ लाख ७७ हजार ३५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Rosemary Hair Oil Benefits: अंघोळीच्या पाण्यात टाका रोझमेरी तेल, झपाट्याने होईल केसांची वाढ

Pune : एकतर्फी प्रेमातून कांड, राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून, आरोपीला जन्मठेप

Expressway : पुणे ते जळगाव फक्त ३ तासात! नवीन एक्सप्रेस वे नेमका कसा असेल? वाचा

Skin cancer symptoms: त्वचेवर अचानक ही ५ लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT