11 stolen bikes and auto rickshaw recovered 1 held by pune police saam tv
क्राईम

Pune Crime News : पुण्यात दुचाकी चाेरणा-या बाणेर, वाकड, थेरगावातील युवकांना अटक, 11 वाहनांसह रिक्षा जप्त

या आरोपींनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून किशन राम आणि चंद्रकांत पाटेकर यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीची रिक्षा जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune :

पुण्यात वाहन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना चतुःशृंगी पोलिसांनी (chaturshringi police station) अटक केली. त्यांच्याकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपींच्या ताब्यातून साडेसहा लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चतुःशृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अटक केलेल्यांमध्ये कन्हैया दत्तप्रसाद पवार (वय १९, रा. कळमकर चौक, बाणेर रस्ता), किशन राजेश राम (वय २०, रा. वाकड) आणि चंद्रकांत रामा पटेकर (वय २४, रा. थेरगाव) यांचा समावेश आहे. या आरोपींनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

शहरातील वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. चतु:शृंगी पोलिसांचे तपास पथक वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपींचा शोध घेत होते. त्यातून हे गुन्हेगार सापडल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT